भारतात फाशी द्यावी : केेेद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : ईगल आय मीडिया
मुंबईत 12 मार्च 1993 रोजी सिरीयल बोम्बस्फोट घडविणारा प्रमुख गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा गेली 27 वर्षे पाकिस्तान मध्ये लपून राहिलेला आहे. याची पाकिस्तान ला पूर्ण माहिती आहे मात्र तरीही दाऊद भारताच्या सुपूर्द करण्यास पाकिस्तान भारताला सहकार्य केले नाही.आता मात्र पाकिस्तानमधील 80 दहशतवादी गुन्हेगारांची नावे पाकिस्तान सरकार ने जाहीर केलीत त्यात दाऊद चे नाव आहे. त्यामुळे आता पाकिस्तान ने त्वरित दाऊद इब्राहिम ला भारताच्या हवाली करावे त्या साठी भारत सरकार ने ही पाकिस्तान वर दबाव टाकला पाहिजे असे मत व्यक्त करून आपण गृहमंत्रालयाला याबाबत पत्र पाठविणार असल्याच्या प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
दाऊद इब्राहिम हा मूळचा मुंबईचा असून त्याच्यावर अनेक खंडणीचे आणि खुनाचे गुन्हे नोंद आहे. संघटित गुन्हेगारीमध्ये लिप्त असणारा आणि पुढे मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट करून आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांसारखे क्रूर गुन्हे घडविणाऱ्या दाऊद ला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी पाकिस्तान ने दाऊद भारताच्या हवाली करावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.