कोरोना लस वितरणाची ‘फायजर’ ने भारताकडे परवानगी मागितली

इंग्लड , बहरिन ने दिली आहे परवानगी

टीम : ईगल आय मीडिया

इंग्लंड आणि बहरिन या देशांनी फायजर कंपनीच्या कोरोना लसीला परवानगी दिल्यानंतर आता फायजर ने भारतात ही लस आयात आणि वितरणाची परवानगी मागितली आहे. 4 डिसेंबर रोजी कम्पनीच्या वतीने भारतीय औषध महानियंत्रक यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान ही लस उणे 70 अंश सेल्स. तापमानात ठेवावी लागत असल्याने भारतात तिचा किती परिणाम होईल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

इंग्लंड मध्ये फायजर बुधवारी फायजर कंपनीच्या लस वितरणास परवानगी दिली आहे. तसेच ही लस 95 टक्के परिणामकारक असल्याचाही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर फायजर कंपनीची भारतीय शाखा फायजर इंडिया ने भारतीय औषध महानियंत्रक यांच्याकडे देशात लस आयात करून विक्रीची परवानगी मागितली आहे.

विशेष म्हणजे आपत्कालीन उपयोग प्राधिकरण अंतर्गत लस भारतात आयात करून विक्रीची परवानगी मागितली आहे. त्याचबरोबर चिकित्सा ट्रायल नियम 2019 अंतर्गत देशातील नागरिकांवर तिचे परीक्षण करण्यापासून सवलत देण्याची ही मागणी केली आहे. दरम्यान ही लस उणे 70 अंश सेल्सियस तापमानावर ठेवावी लागणार असल्याने भारतातील उष्ण वातावरणात तिचा परिणाम किती होणार याबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!