उत्तरप्रदेशात गाझियाबाद येथील घटना
टीम : ईगल आय मीडिया
उत्तर प्रदेश सरकारने लोकसंख्या नियंत्रण विधेयकाची तयारी केलेली असतानाच गाझियाबाद येथील एका महिलेने चक्क एकाचवेळी 4 मुलांना जन्म दिला आहे. 4 ही मुलं आणि बाळंतीण एकदम ठणठणीत असल्याची Good News ही डॉक्टरांनी दिली आहे.
उत्तर प्रदेश कायदा आयोगाने ‘दोन मुलांच्या धोरणा’वर प्रस्ताव तयार केला असून दोन पेक्षा अधिक मुले असतील तर सर्व शासकीय सुविधा मिळणार नाहीत. हा प्रस्ताव तयार केलेला असतानाच गाझियाबादमधील महिलेने खासगी रुग्णालयात आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने चार मुलांना जन्म दिला आहे. या 4 मध्ये तीन मुले आणि एक मुलगी आहे. डॉ शशी अरोरा आणि डॉ. सचिन दुबे यांच्या देखरेखीखाली महिलेचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून या महिलेचे कुटुंब आपल्या घरात नवीन पाहुणे कधी येतात याची वाट पाहत होते. 2 वर्षांपासून सदर पती आणि पत्नी यांच्यावर ivf तंत्रज्ञानानुसार उपचार सुरू होते. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांनी सांगितले की, आई व तिची चार मुलेही तब्येतीने ठणठणीत आहेत आहे.
डॉ शशी अरोरा म्हणाले की, हे जोडपे कित्येक वर्षांपासून आपल्या मुलाची अपेक्षा बाळगून होते. त्या बाईला मूल होऊ शकले नाही आणि तिच्यावर उपचार देखील केले गेले. दोन वर्षांच्या उपचारानंतर तिने चार मुलांना जन्म दिला. मीडिया रिपोर्टनुसार, आयव्हीएफ उपचारातून चार मुले जन्माच्या बातमीने ही महिला आणि तिचे कुटुंब खूप आनंदित झाले आहेत.