राम मंदिर भूमिपूजन : आज देशासाठी ऐतिहासिक क्षण

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली

टीम : ईगल आय मीडिया
शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होऊन करोडो हिंदूंच्या मनातील राम मंदिर आकारास येत आहे. या ऐतिहासिक मंदिर उभारणीच्या कामास आजपासून सुरुवात होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन होत असून अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम पळून अयोध्यावासीय दिवाळी साजरी करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान मोदी हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील. त्यानंतर ते रामलल्लाचे दर्शन घेतील आणि भूमिपूजन समारंभात सहभागी होतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे १७५ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील. निमंत्रणपत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल. गर्दी टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ३५ सेकंदाचा आहे
दुपारी १२ वाजून ४४ मिनिट ८ सेकंदानी भूमिपूजन सुरु होऊन ३५ सेकंदात पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संघ प्रमुख मोहन भागवत यावेळी सहभागी होणार आहेत.
निमंत्रण [पत्रिकांना कोड असल्याने निमंत्रितांशिवाय कुणीही भूमिपूजन स्थळी प्रवेश करू शकत नाही

भूमिपूजन सोहळा साजरा होत असताना करोनाचे नियम पाळण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे निमंत्रितांशिवाय अन्य कोणालाही अयोध्या शहरात प्रवेश करू दिला जाणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले. बाजारपेठ आणि दुकाने सुरू राहणार असली तरी नियमांचे पालन बंधनकारक आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!