राफेल झेपावले : बुधवारी भारत भूमीवर लँडिंग


पुढील आठवड्यात चीनच्या सीमेवर तैनात होईल


टीम : ईगल आय मीडिया
बहू प्रतिक्षीत आणि बहू चर्चित 5 राफेल लढाऊ विमानाचा पहिला ताफा अखेर भारताच्या दिशेने झेपावला असून सुमारे ७ हजार ३०० किमी चे अंतर पार करून हा ताफा बुधवारी हरियाणातील अंबाला येथील हवाई तळावर उतरणार आहे. या विमानामुळे भारताची संरक्षण सिद्धता वाढली असून पुढील आठवड्यात हि विमाने भारत – चीन सीमेवर तैनात केली जाणार आहेत.


गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेली राफेल लढाऊ विमाने अखेर सगळे अडथळे पार करून भारताकडे झेपावली आहेत. फ्रान्सच्या हवाई तळावरून सोमवारी ५ भारतीय वायुसेनेच्या ५ पायलट्सनी या विमानसोबत टेक ऑफ केले. भारताच्या राजदूतांनी या विमानांना निरोप दिला.

भारत आणि फ्रांस दरम्यान सुमारे ५८ हजार कोटी रुपयांना ३६ विमाने खरेदी केली आहेत. पहिल्या टप्प्यात १० विमाने मिळणार होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ५ विमाने तयार करून पाठवली आहेत. फ्रान्समध्ये भारतीय वायू सेनेच्या जवानांना प्रशिक्षण दिले गेले असून भारतीय वायू दलातील पायलट्स हि विमाने घेऊन निघाले आहेत. मार्गावर संयुक्त अरब अमिरातमध्ये इंधन भरणार आहेत. बुधवारी हरियाणा येथील अंबाला हवाई तळावर हि विमाने उतरणार आहेत. या विमानामुळे भारताची हवाई ताकद वाढली असून चीनच्या सीमेवर हि विमाने पुढच्या आठवड्यात तैनात केली जातील.

Leave a Reply

error: Content is protected !!