510 कोटींना विकत घेतले दारूचे दुकान

72 लाख होती बेस प्राईस : 15 तास चालली बोली

टीम : ईगल आय मीडिया

राजस्थानमधील हनुमानगढ येथील दारुच्या दुकानासाठी चक्क 510 कोटी रुपयांची बोली लागली असुन दोन महिलांनी हे दुकान लिलावात विकत घेतले आहे.

राजस्थानमध्ये दारुच्या दुकांनांचा लिलाव केला जातो. सध्या व्ह्यच्यूअल बिडिंगच्या माध्यमातून सात हजार ६६५ ठिकाणी लिलाव सुरु आहे. त्यानुसार राजस्थान च्या ग्रामीण भागातील हनुमान गढ येथील दारूच्या दुकानाची बोली तब्बल 510 कोटी रुपयांना झाली आहे.

सकाळी ११ वाजता लिलाव सुरु झाला आणि तो तब्बल १२ तासांहून अधिक म्हणजेच मध्यरात्रीनंतरही सुरु होता. 72 लांखांपासून सुरु झालेली ही बोली १५ तासांनंतर संपली. १५ तास चालेल्या या लिलावामध्ये प्रत्येकजण एकाहून एक वरचढ बोली लावत होता. या दुकानाला ५१० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आणि लिलाव पूर्ण झाला. होय तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण हे दुकान खरोखर ५१० कोटींना विकलं गेलं आहे.

या दुकान एकाच कुटुंबातील दोन महिलांनी विकत घेतलं आहे. यापैकी एका महिलेचं नाव किरण कनवार आहे. सध्या राजस्थानमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून सामान्यपणे दारुच्या दुकानांचा लिलाव करण्यात येतो. याच लिलावाचा भाग म्हणून या दुकानावर बोली लावण्यात आली आणि त्याला तब्बल ५१० कोटींची किंमत मिळाली.

एवढी मोठी किंमत या दुकानासाठी मिळेल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनाही वाटलं नव्हतं. त्यामुळे ही रक्कम ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. मागील वर्षी या दुकानाला लिलावामध्ये ६५ लाखांची किंमत मिळाली होती म्हणून यंदा ७० लाखांपासून या दुकानाचा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


हा लिलाव संपल्यानंतर आका उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील हलचाली सुरु केल्या आहेत. कनवार कुटुंबियांना या दुकानाच्या किंमतीच्या दोन टक्के रक्कम तातडीने उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!