टीम : ईगल आय मीडिया
८ राज्यामधील राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांनी भाजपला जोरदार आव्हान दिले. आंध्र प्रदेशात वाय एस आर काँग्रेसने सर्व चारही जागा जिंकल्या तर मध्य प्रदेशात भाजपने ३ पैकी २ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदीया , सुमेर सिंह सोळंकी, काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह विजयी झाले आहेत. राजस्थानमध्ये ३ पैकी २ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. इथे काँग्रेसचे वेणुगोपाल आणि नीरज डांगी तर भाजपाकडून राजेंद्र गहलोत विजयी झाले आहेत.
. मात्र गुजरातमध्ये ४ पैकी भाजप ३ जागी, झारखंडमध्ये १ जागी झामुमो जिंकला आहे.
या निवडणुका मार्च महिन्यातच होणार होत्या मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज देशभरातील आठ राज्यांधील १९ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे.राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपने मध्यप्रदेशात काँग्रेसला धक्का देत १ जागा जास्त जिंकली तर राजस्थानात काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे २ जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये ४ जागी निवडणूक होत असून ५ उमेदवार रिंगणात आहेत. होते, पैकी भाजप 3 आणि काँग्रेसने 1 जागी विजय मिळवला.