५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
टीम : ईगल आय मीडिया
साडेपाच एकर जागेवर, जमिनीपासून १९ फूट उंचावर ५ कळस असलेल्या भव्य राममंदिराचे भूमिपूजन येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी ५ ऑगस्टपासून सुरू होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच दिवशी भूमिपूजनासाठी येतील. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवरांची उपस्थिती असेल. पूजन तसेच मंत्रोच्चारासाठी वाराणसीहून पुजारी येतील अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी दिली. ट्रस्टच्या वतीने ते मंदिरासाठी ४० किलो वजनाची चांदीची श्रीराम शिळा सोपवतील. या शिळेची पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्थापना होईल.विहिंपने १९९२ साली बनवलेल्या मंदिराच्या मूळ मॉडेलचा आता विस्तार केला आहे. शिवाय विहिंपच्या न्यासाने मध्यंतरीच्या काळात कोरून ठेवलेल्या शिळांचा मंदिर बांधकामात वापर होईल. राजस्थानातून या शिळा आणल्या जातील व मंदिर परिसरातच त्यावर कोरीव काम केले जाईल.
१६१ फूट उंच, 5 कळस आणि मंडप असलेल्या नव्या स्वरूपातील मंदिर ५.५ एकरात उभे राहील.
तर मंदिराचे गर्भगृह जमिनीपासून १९ फूट उंच असेल आणि जमिनीपासून १९ फुटांचे दोन टप्पे असतील त्यावर मंदिर असणार आहे. विहिंपने १९९२ साली बनवलेल्या मंदिराच्या मूळ मॉडेलचा आता विस्तार
पाच कळसांच्या या मंदिराच्या समोर दिशेनुसार पंचदेव विराजमान असतील. ट्रस्टच्या सूत्रांनुसार, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंदिर अधिक भव्यदिव्य असावे म्हणून त्याच्या नव्या रचनेवर ६ महिन्यांपासून काम सुरू होते. याची जबाबदारी चंद्रकांत सोमपुरा यांच्यावर सोपवण्यात आली होती. ट्रस्टकडे ६७.७ एकर जमीन असली तरी मंदिरासाठी यातील ५.५ एकर वापरली जाईल. उर्वरित ६२.२ एकर भाविकांच्या सुविधांसाठी वापरली जाईल.