राम मंदिर राष्ट्रीय भावनेचे प्रतीक : पंतप्रधान मोदी

 

ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन समारंभ संपन्न

टीम : ईगल आय मीडिया

आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहत आहोत यावर विश्वास बसत नसेल,पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अयोध्येत 12 वाजून 44 मिनिटांनी राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य अर्पण केलं. राम मंदिरसाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे. या मंदिरासोबत फक्त इतिहास रचला जात नसून इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, राम मंदिर राष्ट्रीय भावनेचं तसंच संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल. याशिवाय कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचं प्रतिक असेल.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आदि सह 175 साधू, संत आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने संपूर्ण अयोध्या राममय झाली होती. देशभरात करोडो रामभक्तांनी हा सोहळा वृत्तवाहिण्यावरून live पाहिला.

Leave a Reply

error: Content is protected !!