मुंबई : ईगल आय मीडिया
हाथरसच्या दलित मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आज ( दि. 3 ऑक्टोबर ) रोजी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश च्या राज्यपाल माननीय आनंदीबेन पटेल यांची लखनौ येथे भेट घेणार आहेत.
हाथरसमधील दलित मुलीच्या सामूहिक अत्याचार आणि हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन लवकरात लवकर आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फ़े ना रामदास आठवले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करणार आहेत.
सामूहिक अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यास हाथरस येथे आज केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले जाणार होते, मात्र हाथरस जिल्हा प्रशासनाने विनंती केल्यामुळे हाथरसला जाण्याचा दौरा पुढील आठवड्यात आयोजित करणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी जाहीर केले.
हाथरस मध्ये जाण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रशासनाने विरोध केल्यामुळे काँग्रेस ने देशात मोठे आंदोलन केले होते. मात्र तसे आंदोलन काँग्रेसने हाथरस मधील बळी गेलेल्या मुलीवर झालेल्या
अत्याचाराच्या निषेधार्थ करायला पाहिजे होते, असा मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.