प्रशांत भूषण यांच्या साथीला अरुण शौरी आले
टीम : ईगल आय मीडिया
जेष्ठ वकील प्रशांत भूषण आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात सुरू असलेल्या वादात आता अटलबिहारी वाजपेयी मंत्री मंडळातील मंत्री आणि पत्रकार, लेखक अरुण शौरी यांनी उडी घेतली आहे. विशेष म्हणजे शौरी यांनीही सुप्रीम कोर्टाने टीकेमुळे अवमानित समजू नये अशी भावना व्यक्त केली आहे.
प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालय संदर्भात केलेल्या दोन ट्विट संदर्भात दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत २४ ऑगस्ट पर्यंत भूषण यांनी केलेल्या ट्विट बद्दल माफी मागावी, पुनर्विचार करावा असे कोर्टाकडून सांगण्यात आलेले आहे. दरम्यान, प्रशांत भूषण यांनी आपण माफी मागणार नसल्याचे सांगून आपल्या विचारांवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, माजी मंत्री अरुण शौरी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जर दोन ट्विटमुळे न्यायालयाची अवमानना होत असेल तर लोकशाहीचा हा प्रमुख खांब किती तकलादू झाला आहे हेच यटतून पुढे येते, असे म्हटले आहे. न्यायालयाचा मान हा न्यायाधीशांनी केलेले काम आणि त्यांनी दिलेला निर्णय यामुळे घटत असतो असेही शौरी यांनी म्हटले आहे. कोर्ट स्वतःला जर सुरक्षित ठेवू शकत नसेल तर आम्हाला ते कसे सुरक्षित ठेवणार असेही म्हटले आहे. प्रशांत भूषण यांचे ट्विट लोकशाहीच्या प्रमुख खांबाला बाधा आणणारे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर ही शौरी यांनी नाराजी व्यक्त केली. एखाद्या निर्णयावर टीका तसेच विश्लेषण करणे कोर्टाची अवमान होऊ शकत नाही. असेही ते म्हणाले.
भूषण यांनी २७ जून रोजी केलेल्या ट्विट मध्ये औपचारिक आणीबाणीची घोषणा न होता गेल्या सहा वर्षात न्यायालयीन व्यवस्था कमजोर झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांवर टीका केली होती. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेऊन भूषण यांना नोटीस बजावली होती. केलेल्या दोन ट्विटमुळे न्यायालयाचा अपमान होत असेल तर समोरच्या व्यक्तीला ही मत मांडण्याची संधी दिली पाहिजे. देश हिताच्या रक्षणासाठी सत्य महत्त्वाचे मानले जाणार नाही का? राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हे तत्व देशाला घालून दिले असल्याचे शौरी यांनी म्हटले आहे.