पाण्यात बुडून 7 मुलींचा मृत्यू

7 पैकी 3 मृत मुली सख्या बहिणी

टीम : ईगल आय मीडिया

झारखंच्या लातेहार जिल्ह्यात बालूमाथ येथे करमा डाली विसर्जनासाठी गेलेल्या सात मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मयत 7 पैकी 3 मुली सख्या बहिणी आहेत. संबंधित घटना ही बालूमाथ पोलिस ठाणे हद्दीतील शेरेगाडा गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एकाच गावातील ७ मुलींचे अशाप्रकारे निधन झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

संपूर्ण गाव शोकात आहे. या घटनेमुळे गावातील उत्साहाचे रुपांतर क्षणार्धात दु:खात झाले आहे. मृतक मुलीचे वय हे १० ते २० वर्षांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे मृतक मुलींमध्ये तीन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकलू गंझू हे आपल्या कुटुंबियांसोबत गावात वास्तवास होते. त्यांच्या तीन मुलींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. टोरी-बालूमाथ-शिवपूर रेल्वे लाईन निर्मितीसाठी एक मोठे खड्डे खोदण्यात आले होते. याच खड्ड्यात पावासामुळे पाणी साचल्याने हे खड्डे तलावासारखे झाले होते. त्यामुळे मुली या खड्ड्यात करमा डाल विसर्जनासाठी गेल्या होत्या. या दरम्यान संबंधित घटना घडली.

गावक-यांकडून मुलींना वाचवण्याचा प्रयत्न
संबंधित घटना घडल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी गावात धावात गेले. त्यांनी गावक-यांना याबाबत सांगितले. त्यानंतर गावकरी धावत घटनास्थळी आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता.

गावक-यांनी मुलींना बाहेर काढले. पण तोपर्यंत ४ मुलींचा मृत्यू झाला होता. इतर तीन मुलींचा श्वास सुरु होता. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी तीनही मुलींचा मृत्यू झाल्याचे घोषित झाले.

Leave a Reply

error: Content is protected !!