बिहारमध्ये शिवसेनेला ‘बिस्कीट’

जदयु चा ‘बाण’ धनुष्यबाणाला आला आडवा

टीम : ईगल आय मीडिया

बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या पक्षाचे बाण हे निवडणूक चिन्ह आहे, त्यामुळे जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्यानंतर शिवसेनेला निवडणूक आयोगाने ‘ बिस्कीट ‘ हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे सेनेची बिहारमध्ये प्रचार करताना अडचण होणार असल्याचे दिसते.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष सत्तेत असून ‘बाण’ हे जदयूचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो आणि आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देऊ नये, अशी मागणीही जदयूने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट यापैकी एक निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतेच चिन्ह त्यांना मिळाले नाही. त्याऐवजी त्यांना बिस्किट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. शिवसेनेने बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबद्दल सेनेने हरकत घेतली असून अद्याप उत्तर आलेलं नाही.

राष्ट्रीय पक्ष मान्यता नसल्याचा फटका शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे सेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह केवळ महाराष्ट्रात मान्यता प्राप्त आहे. राज्याबाहेर सेनेला या निवडणूक चिन्हावर हक्क दाखवता येत नाही. राष्ट्रीय पक्ष ही मान्यता मिळाल्यानंतर एकच चिन्ह संपूर्ण देशात प्रत्येक निवडणुकीत वापरता येते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाना देशभर एकच चिन्ह मिळते.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुक शिवसेनेने एकूण ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेला एकूण २ लाख ११ हजार १३१ मते मिळाली होती. एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. तर यापैकी तीन जागांवर शिवसेनेमुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!