गायक एस. पी. बालसुब्रण्यम आय. सी. यु. मध्ये

५ ऑगस्ट रोजी झाले कोरोना निदान

टीम : ईगल आय मीडिया
हजारो गीतांच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडणाऱ्या सुप्रिसद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचा कोरोना सोबत संघर्ष सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान उपचारासाठी त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना आता आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.
५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

Leave a Reply

error: Content is protected !!