टीम : ईगल आय मीडिया
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांचं स्मारक तामिळनाडू सरकार बनवणार असून त्या स्मारकात जयललितांचे सोन्या, चांदीचे दागिने, त्यांनी वापरलेले फ्रिज टीव्ही आणि जयललितांच्या संग्रहातील ८ हजार ३७६ पुस्तकेही असणार आहेत. नुकतेच जयललिता यांच्या पोएस गार्डन येथील घरातून या वस्तू तामिळनाडू सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. जयललिता यांच्या वेदा निलयम या तीन मजली घराचं स्मारकात करण्याचा निर्णय घेतला आहे, या स्मारकात प्रदर्शनही असणार आहे. या स्मारकात काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत.
यामध्ये ४ किलो सोनं, ६१० किलो चांदी, ८ हजार ३७६ पुस्तकं, ३८ एसी, १० हजार ४३८ ड्रेसेस, ११ टीव्ही,१० फ्रिज, २९ टेलिफोन आणि मोबाइल्स, १०८ कॉस्मॅटिक आयटम्स, ३९४ सन्मानचिन्हं आणि ६ घड्याळं अशी मालमत्ता ताब्यात घेतली आहे. यापैकी काही निवडक वस्तू या त्यांच्या स्मारकात ठेवल्या जाणार आहेत.
तामिळनाडू सरकारच्या अधिग्रहणाला जयललिता यांच्या कायदेशीर वंशजांनी विरोध केला असला तरीही सरकार स्मारक करणार असून सरकारने वेदा निलयम ताब्यात मिळवण्यासाठी २५ जुलै रोजी सिव्हिल कोर्टात ६७.९ कोटी जमा केले होते.