निवडणूक आयोग एन डी ए च्या बाजूने

राजद नेते तेजस्वी यादव यांचा गंभीर आरोप

टीम : ईगल आय मीडिया

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीलाच लोकांनी कौल दिला होता. मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता त्यामुळे ते निवडणूक जिंकले असा गंभीर आरोप करून, मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो असं राजदचे नेते आ.तेजस्वी यादव म्हणाले. आज पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव बोलत होते.

बिहार निवडणूक निकालात NDA ला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. मात्र मतमोजणीच्या दरम्यान एनडीए आणि महाआघाडीत चांगलीच चुरस पाहण्यास मिळाली.


निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत असा आरोप केला होता. जनमताचा कौल हा आमच्या बाजूनेच होता मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता मात्र महा आघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

त्याचबरोबर भाजपाने असं करण्याची ही पहिली वेळ नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाली त्यावेळीही जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता मात्र भाजपाने मागच्या दाराने प्रवेश करुन सत्ता मिळवली असंही यादव यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!