टीम : ईगल आय मीडिया
दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील ३७ डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातील ५ डॉक्टरांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीत गेल्या काही आठवड्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. दिल्ली प्रथमच ७ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्लीत पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत आहे. दिल्ली आरोग्य विभागाने गुरुवारी आकडेवारी जारी केली, यानुसार गेल्या २४ तासांत ७४३७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३६८७ जण करोनातून मुक्त झाले आहेत. दिल्लीत सध्या २३१८१ करोनाचे रुग्ण आहेत.
देशात करोना व्हायरसची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत आता ३७ डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीतील खासगी सर गंगाराम हॉस्पिटलमधील हे डॉक्टर आहेत.
हॉस्पिटलमधील करोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या ३७ डॉक्टरांना संसर्ग झाला आहे. यातील बहुतेक डॉक्टरांमध्ये करोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. एकूण ३२ डॉक्टर आयसोलेशनमध्ये आहे. इतर ५ डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, हॉस्पिटलमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
धक्कादायक बाब आहे.