हजारो ट्रॅक्टर्स ची राजधानिकडे धाव
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सूरु असलेले शेतकरी आंदोलन सुरूच असून 26 जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत 2 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स ची रॅली काढण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सुरुवातीला विरोध करणाऱ्या दिल्ली सरकारने अखेर शेतकऱ्यासमोर नमते घेत ट्रॅक्टर रॅलीस परवानगी दिली असून 2 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स दिल्लीच्या दिशेने धावू लागले आहेत.
दरम्यान यमुना एक्सप्रेस वे वर ट्रॅक्टर्स ना उत्तरप्रदेश सरकारने परवानगी नाकारली आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी साठी दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. केंद्रसोबत 11 वेळा चर्चा करूनही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, त्यामुळे आंदोलन दरदिवशी उग्र होत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर ट्रॅक्टर्स रॅली काढण्याचा शेतकऱ्यांचा इरादा होता.
अखेर सरकारने ता रॅलीस परवानगी दिली आहे. मात्र ही रॅली राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलन पूर्ण झाल्यानंतर काढण्यास परवानगी दिली आहे.त्यासाठी 2 लाख ट्रॅक्टर्स दिल्लीत रॅली काढणार आहेत. यासाठी 2 हजार 500 स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. या रॅलीतील ट्रॅक्टर्स ची संख्या वाढण्याची शक्यता किसान आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष प्रजासत्ताक दिनी दिल्लीत निघणाऱ्या या रॅली कडे लागले आहे.