टीम : ईगल आय मिडीया
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या तरी कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने घरीच उपचार केले जात आहेत.
Vice President of India च्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती ट्विट करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना करोनाची लक्षणं नाहीत तसेच त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे अशीही माहिती देण्यात आली.
दरम्यान, व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना स्व विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. उपराष्ट्रपती सचिवायलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्यंकय्या नायडू यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.
आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची रुटीन करोना टेस्ट अर्थात नियमित करोना चाचणी आली. ज्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.