योगी सरकारने राजीनामा द्यावा !

उत्तर प्रदेशातील घटनांवर खा. सुप्रिया सुळे संतापल्या

टीम : ईगल आय मीडिया

“दोन दिवसात उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री काहीही बोलण्यास तयार नाहीत. यासंबंधी सविस्तर चौकशी व्हावी अशी मी पंतप्रधानांना विनंती करते. राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असाल तर योगी सरकारने राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खा. सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलताना त्यानी उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली. देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत,” खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं, तसंच ज्या पद्धतीची वक्तव्यं जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत, त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!