कोरोना : लग्नाच्या 10 व्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू

नवरीसह कुटुंबातील 9 जण कोरोना बाधित

टीम : ईगल आय मीडिया

लग्नात पुरेशी काळजी न घेतल्यामुळे लग्न झाल्याच्या 10 व्या दिवशी नवरदेवाचे निधन झालं तर नवविवाहीतेसह कुटुंबातील 9 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील ही घटना आहे.

गेल्या काही दिवसांपासून लग्नाची संख्या पुन्हा वाढीस लागली असून लोक बिनधास्तपणे लग्नाला गर्दी करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील या घटनेमुळे विवाहेच्छुक कुटुंबांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे समोर आले आहे.

पिटीआई च्या वृत्तानुसार, फैजबाद येथील युवकाचे 25 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते आणि लग्नानंतर काही दिवसांतच त्याला त्रास जाणवू लागला, त्यातच 4 डिसेंबर रोजी नवविवाहित युवकाचा मृत्यू झाला. त्या युवकाची कोरोना टेस्ट केली नव्हती, मात्र मृत्यूची कारणे लक्षात घेऊन त्याच्या मृत्यूनंतर घरातील सर्व नातेवाईकांची तपासणी केली असता 9 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

यामध्ये नवविवाहितेचा ही समावेश आहे. फैजाबाद च्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की फैजाबाद मध्ये कोरोना तपासणी शिबीर आयोजित केले असून आणखी संपर्कातील लोकांना शोधून त्यांची तपासणी सुरू केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!