तेजस कंपनीची सर्व उत्पादने उत्कृष्ट दर्जाची : आ. देशमुख

भंडीशेगाव येथील तेजस ऍग्रो कंपनीस आमदार सुभाष देशमुख यांची भेट

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील तेजस ऍग्रो इरिगेशन सिस्टीम या कंपनीस माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन संपूर्ण कंपनीची पाहणी केली.यावेळी राष्ट्रपती पदक विजेते माजी पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर हे उपस्थित होते.

ग्रामीण भागात शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेतीशी निगडित व्यवसाय भंडीशेगाव च्या माळरानावर उभा करून याच भागातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम तेजस पाईप कंपनीने केले असून या कंपनीचे सर्व उत्पादन उत्कृष्ट दर्जाचे असून तरुणांनी तेजस कंपनी चा आदर्श घेऊन नोकरीच्या मागे न लागता, आपल्या भागातच छोटे मोठे व्यवसाय करून आपले गाव समृद्ध करावे असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

तेजस पाईप कंपनी मध्ये शेतीमध्ये सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य तयार केले जाते.यामध्ये पीव्हीसी पाईप,ठिबक च्या लॅटरल,तसेच पाईप लाइन साठी लागणारे सर्व साहित्य तेजस कंपनी सर्व मानांकन प्राप्त बनवते आहे अशी माहिती कंपनीच्या डायरेक्टर शुभांगी माडगूळकर यांनी यावेळी सांगितले.

सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संकल्पनेतून 14 एकर माळरानावर वृक्षारोपण करण्याचे आयोजन असून या वृक्षारोपनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वृक्ष लागवड साठी आमदार सुभाष देशमुख आले होते.

भंडीशेगाव येथे लवकरच लोकमंगल बँकेचे सेवा केंद्र सुरू करून गाव समृद्ध बनवण्यासाठी परिसरातील तरुणांना,बचत गटांना,महिला व्यावसायिक याना कमी कागदपत्र व तत्पर सेवा देण्यासाठी लोकमंगल बँकेचे सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे अजित कंडरे यांनी सांगितले.

मागील वर्षीचा उत्कृष्ट पोलीस सेवा कार्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळलेबद्दल गणपतराव माडगूळकर यांचा यांचा यावेळी सत्कार आमदार सुभाष देशमुख यांनी केला.

यावेळी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक अजित कंडरे,अमित इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज चे चेअरमन बाळासाहेब लोकरे, डॉ.अनिल कंडरे, श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, निशांत माडगूळकर, उपसरपंच संतोष ननवरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश रणखांबे, ज्ञानेश्वर गिड्डे, विश्वास सुरवसे, प्रशांत वाघमारे, साधना गिड्डे, हसीना शेख, सचिन येलमार,डॉ.श्रीधर येलमार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!