अफगाणिस्तानी आकांत : जगभरात हळहळ
टीम : ईगल आय मीडिया
तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर लोक देश सोडून पळत आहेत. 134 लोकांच्या प्रवासाची क्षमता असलेल्या अमेरिकन सैन्याच्या विमानात तब्बल ८०० जण बसले आणि तरीही विमामाने झेप घेतली. विक्रमी प्रवासी घेऊन अमेरिकी लष्कराच्या पायलट्स नी माणुसकीसाठी जोखीम घेतली. लोकांच्या डोळ्यातील भीती पाहून क्रू मेंबर्सन विमान उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तान मध्ये तालिबानचे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर मृत्यूचे भय आणि सैतानांच्या तावडीतून सुटण्याचे हरप्रकारे प्रयत्न याचे भयावह दृश्य अमेरिकन विमानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आले आहेत. राजधानी काबूल येथे हमीद करजई एअरपोर्टवर विमानाला लटकून देश सोडण्याच्या प्रयत्नात सोमवारी तीघांचा मृत्यू झाला होता. त्यांनंतर आणखी काही भयानक दृश्ये समोर आली आहेत. त्यापैकी एक १३४ मर्यादा असलेल्या विमानात तब्बल ८०० जण बसले असल्याचे दाखवणारा फोटो सध्या जगभर सोशल मीडियावर फिरतो आहे. अमेरिकी वायुदलाच्या केसी-१७ ग्लोबमास्टरचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर भयावह दृश्य समोर आले.
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन विमानाचा दरवाजा उघडताच अफगाणिस्ताचे शेकडो लोक विमानात घुसले. या विमानात इतके लोक पेलण्याची ताकद नाही. पण क्रू मेंबर्सनी कुणालाही बाहेर काढले नाही. त्यांना घेऊनच उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. क्रू मेंबरचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी सर्वांना वस्तुस्थिती सांगितली आहे. या ८०० प्रवाशांत ६५० अफगाण नागरिक होते.
डिफेन्स वन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आजपर्यंत मिलिटरी विमानांनी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमधील हे रेकॉर्ड आहे.
२०१३ मध्ये फिलिपाईनमध्ये आलेल्या भयंकर वादळावेळी अमेरिकेने आपल्या सी-१७ या विमानातून एकावेळी ६७० लोकांना बाहेर काढले होते. हा विक्रम या विमानाने मोडला आहे. या विमानाचा फोटो आल्यानंतर बाकी लोक खाली बसल्याचे दिसत आहे. अतिरेकी आणि क्रूर चेहऱ्यांना घाबरून अफगान लोक देश सोडत आहेत.