दहशतवादी हल्ल्यात 137 नागरिक ठार

टीम : ईगल आय मीडिया

आफ्रिका खंडातील देश नायजरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन तासांत १३७ जण ठार झालेत. दहशतवाद्यानी केलेल्या या भीषण हल्ल्यामुळे गावाचे स्मशानात रुपांतर झाले. यावेळी दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.

नायजरच्या पश्चिम भागातील टाहौआतील इंटाजेने, बॅकोरेट आणि अन्य ठिकाणच्या गावांमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा भाग माली देशाच्या सीमेजवळ आहे. सध्या तरी या दहशतवादी हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६०जणांच्या मृत्यू झाल्याची पु्ष्टी करण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास १३७ जण ठार झाले आहेत.

पश्चिम नायजर भागात मागील काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीही जवळपास ६६ जणांची हत्या करण्यात आली होती. सुरक्षा दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!