अमेरिकेने समुद्रात उडवला 18 हजार किलोचा महाबॉम्ब

3.9 रिष्टर चा जाणवला भूकंप

टीम : ईगल आय मीडिया

अमेरिकन नौदलाने आपल्या नवीन एअरक्राफ्ट कॅरिअरवर बॉम्ब हल्ल्याची चाचणी केली. त्यासाठी अमेरिकन नौदलाने समुद्रात एक भीषण स्फोट घडवून आणला. १८ हजार किलोंचा हा महाबॉम्ब एअरक्राफ्ट कॅरिअर गेराल्ड फोर्डने समुद्रात उडवला. हा स्फोट घडवून आणल्यानंतर 3.9 रिष्टर स्केल च्या भूंकपासारखे हादरे जाणवले. जगभर या स्फोटाची चर्चा सुरू झाली आहे.

व्हीडिओ पहा

चिनी नौदलाच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकन नौदलाने हा स्फोट घडवला आहे. अमेरिकन नौदलाने याला ‘फुल शिप शॉक ट्रायल’ म्हटले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट घडवून आणल्यानंतर समुद्रात 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. अमेरिकन नौदलाने मागील शुक्रवारी ही चाचणी केली. फ्लोरीडातील डयटोना किनाऱ्यापासून 100 मैल अंतरावर ही चाचणी झाली.

अमेरिकन नौदलाने हा स्फोट पाण्यात केला. युद्धप्रसंगी एखाद्या हल्ल्यात एअरक्राफ्ट कॅरिअर किती मारा झेलू शकतो याबाबतची चाचणी करण्यात आली. या महास्फोटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या बॉम्बस्फोटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

पण हा स्फोट पूर्णपणे सुरक्षित असल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. या स्फोटाद्वारे एअरक्राफ्ट कॅरिअर युद्धात किती प्रभावी ठरू शकतो, याची चाचपणी करण्यात आली. या स्फोटामुळे समुद्रातील पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नौदलाने म्हटले.

Leave a Reply

error: Content is protected !!