3 लाख लोक बेघर : 2 आठवड्यांची आणी – बाणी घोषित
टीम : ईगल आय मीडिया
लेबनानची राजधानी बैरूटमध्ये मंगळावारी संध्याकाळी झालेल्या स्फोटातील मरण पावलेल्या लोकांची संख्या 135 झाली असून तर 5 हजार जण जखमी झाले आहेत. आद्यप 100 हुन अधिक लोक बेपत्ता आहेत आणि 3 लाख लोक बेघर झाले आहेत.
दरम्यान, बैरुतच्या बंदराजवळ असलेल्या गोदामात 2 हजार 750 किलो अमोनियम नायट्रेट, फर्टिलायझर आणि दारू गोळा बनवण्याच्या समुग्रीचा असुरक्षित साठा होता. त्याचाच स्फोट झाला असून अद्यापही स्फोटाचे नेमके कारण सापडले नाही. अपघात की घातपात या निष्कर्षाप्रत सरकार आलेले नाही. लेबनॉन सरकारने 2 आठवडे आणीबाणी जाहीर केली असून मदत आणि बचाव कार्य प्राधान्याने सुरू केले आहे. या स्फोटांचा आवाज एवढा भयंकर होता की शहराच्या सर्व दिशांनी 150 किमी तो ऐकला गेला.
या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाली असून जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका, मध्य पूर्वेतील शेजारी देशानी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.मंगळवारी संध्याकाळी बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच हे दोन भयंकर स्फोट झाले. स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील इमारतींच्या काचा फुटल्या. स्फोटाच्या परिसरातील इमारती जमीनदोस्त होऊन तिथे मोठे मैदान झाले आहे. शहरांमधल्या रस्त्यांवर धुराचे लोट,गाड्यांवर इमारतींचे अवशेष दिसत होते. रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. आधी मृतांचा आकडा 70 तर जखमींचा आकडा 4 हजार असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून 135 जणांचा मृत्यू तर 5 हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच 100 हुन अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. बंदराजवळच्या भागात झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या मोठ्या परिसराचे नुसान झालं आहे. रेड क्रॉस, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या मोठ्या संघटनांनी तात्काळ मदत करण्याचे आवाहन केलं आहे. लेबनानमधील यंत्रणा आधीच करोना संसर्गाशी दोन हात करत आहे. लेबनान मध्ये कोरोनाचे 5 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. त्यातच या स्फोटामुळे रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. लेबनान सरकारलाच या स्फोटाने हादरा बसला आहे.