60 जण बेपत्ता : कांगो मधील दुर्घटना
टीम : ईगल आय मीडिया
कांगो मध्ये बोट नदीत बुडल्याने झालेल्या दुर्घटनेत 100 हुन अधिक जण बुडाल्याची भीती आहे, त्यापैकी 51 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर अद्यापही 60 जण बेपत्ता आहेत.
वायव्य मोंगला प्रांताचे राज्यपाल यांचे प्रवक्ते नेस्टर मॅग्बाडो यांनी सांगितले की, 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 60 हून अधिक अजूनही बेपत्ता आहेत. या अपघातात 39 लोक वाचले आहेत.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट पलटी होऊन 50 हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर 60 जण बेपत्ता आहेत. हा अपघात कांगो नदीत झाला.
यापूर्वी कांगोमध्ये 15 फेब्रुवारी रोजी 700 जणांना घेऊन निघालेली एक बोट पलटी झाल्याने 60 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघातही कांगो नदीतच घडला होता. बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, यामुळे बोट बुडाली.