राष्ट्रपतींना नॉनस्टॉप 10 दिवस लागल्या उचक्या

हॉस्पिटलमध्ये केलं दाखल : काय आहे कारण ?

टीम : ईगल आय मीडिया

सलग 10 दिवस ब्राझीलच्या राष्ट्रपतींना उचक्या लागल्या आहेत आणि या उचक्या थांबायचं नावंच घेत नाहीयेत. त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असून तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, राष्ट्रपतींच्या आतड्यांमध्ये काही समस्या असल्यामुळे त्यांना सतत उचक्यांचा त्रास जाणवत आहे.


ब्रा्राँ्राँझझब्राझील राष्ट्रपती कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, 66 वर्षीय बोलसोनारो यांना ब्रासीलियाच्या ‘आर्म्ड फोर्सेस हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांना सतत येणाऱ्या उचक्यांवर तज्ज्ञ उपचार करत आहेत. दरम्यान काही तासांनंतर त्यांना दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला.


‘हॉस्पिटल नोवा स्टार’ने बुधवारी एका विधानादरम्यान म्हटलं की, राष्ट्रपतींवर ‘कन्जर्वेटिव क्लिनिकल ट्रीटमेंट’ सुरु आहे. याचा अर्थ त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया करावी लागणार नाहीये. बोलसोनारो यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा रूग्णालयातील एक फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये ते रूग्णालयातील बेडवर झोपून असल्याचं दिसतंय.


2018च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान बोलसोनारो यांच्या पोटावर वार केले होते. यावेळी त्यांच्या आतड्यांना दुखापत झाली होती. 7 जुलै रोजी एका मुलाखतीत राष्ट्रपती म्हणाले होते, “जे लोक माझं ऐकत आहेत त्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण गेल्या पाच दिवसांपासून मला उचक्या येत आहेत.”

Leave a Reply

error: Content is protected !!