सैनिकामध्ये जनुकीय बदल करण्याचा चीन’चा प्रयत्न

भारतासोबत बर्फाळ प्रदेशात लढण्यासाठी चीनचा प्रयोग

टीम : ईगल आय मीडिया

गलवान खोऱ्यात भारतासोबत सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने  आपली सैनिकी ताकद वाढवण्यासाठी गर्भवती महिलांच्या डीएनएचा (DNA) उपयोग करुन आपल्या सैनिकांना ‘सुपर सोल्जर्स’मध्ये बदलण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी चीनच्या सैनिकांवर बायोलॉजिकल एक्सपेरिमेंटही करण्यात येत आहेत. प्रयोग होत असलेले बहुतांश सैनिक भारत-चीन सीमेवर तैनात आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या प्रयोगाने भारतासह अनेक आशियायी देशांची चिंता वाढवलीय.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात बीजीआय ग्रुपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालाची माहिती देण्यात आलीय. यानुसार सैनिकांवर ब्रेन सर्जरी करुन त्यांना हिमालयाच्या पर्वत रांगेत उंचावर तग धरुन राहण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी गर्भवती महिलांच्या डीएनएचा उपयोग करुन खास औषध बनवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, चीन जगभरातील अनेक देशांच्या गर्भवती महिलांच्या डीएनएवर संशोधन करत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सरकारने देखील चीनच्या या संशोधनावर इशारा दिलाय. चीन आनुवंशिक बदल करुन ‘सुपर सोल्जर्स’ तयार करत आहे, असं मत बायडन प्रशासनाने व्यक्त केलंय. रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे, “चीन सैन्य आणि बीजीआय ग्रुपच्या या प्रयोगामुळे सैनिकांच्या जीनमध्ये बदल करुन त्यांना अनेक गंभीर आजारापासून संरक्षित केलं जाईल.

चीनच्या सैनिकांना खूप उंचावर तैनात करण्यात आल्यानंतर ऐकू येण्यास कमी होण्यापासून अनेक आजार (एल्टीट्यूड सिकनेस) होत आहेत. मागील 1 वर्षात भारत-चीन सीमेवर तैनात असलेले बहुतांश चिनी सैनिक या आजारांनी त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठीच चीन औषध शोधत आहे. यासाठी चीनची कंपनी वेगवेगळ्या देशांमधील 80 लाख महिलांच्या डीएनएचा अभ्यास करत आहे. दरम्यान, चिनी कंपनीने ते केवळ चीनच्या महिलांच्या डेटाचा उपयोग करत असल्याचं म्हटलंय.

Leave a Reply

error: Content is protected !!