अमेरिकेत ४० सेंकदाला एका कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू

1 कोटी 32 लाख रुग्ण : 2 लाख 62 हजारांवर मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया अमेरिकेत करोनाचं संकट अधिक गडद होत असून मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासात ४० सेंकदा एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.


करोनाची दुुुसरी लाट आली असूूून रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी एका दिवसात अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

करोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1. 31 मिलियन नागरिक करोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये करोनानं डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत असून, अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णयही घेतला. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इतर देशांबरोबरच अमेरिकेतील परिस्थितीही पुन्हा एकदा चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येक ४० सेंकदाला एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!