कोरोना संसर्ग हवेतून ही होतो

घराबाहेर जास्त वेळ राहणे धोकादायक : अमेरिकेत नवे संशोधन

टीम : ईगल आय मीडिया

 हवेतून करोनाच्या विषाणूंचा अधिक वेगाने संसर्ग होत असल्याचे अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) म्हटले आहे. त्यामुळे घराबाहेर अधिक वेळ राहणाऱ्यांवर विषाणूंचा हल्ला होण्याची शक्यता अधिक असल्याचे सीडीसीने म्हटले आहे. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा सदस्यी तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.

सीडीसी.ने म्हटले की, कोविड-१९ मुळे SARS-CoV-2 तयार होतो. हवारहित विषाणू श्वास घेताना निघाणाऱ्या सुक्ष्म कणांद्वारे एक व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरात विषाणू प्रवेश करू शकतो. हा विषाणू अनेकदा स्वत: ला परिवर्तित करतो. विषाणूचा प्रोटीन प्रभावी असल्याने मानवी पेशीत घुसखोरी करू शकतो. एकदा शरिरात प्रवेश केल्यानंतर संसर्ग संपूर्ण शरिरात फैलावण्यास सुरूवात होते.

लोक श्वास घेतात, इतरांसोबत बोलत असताना त्यावेळी जवळपासच्या हवेत विषाणू फैलावतात (एरोसोल ट्रान्समिशन) आणि हे विषाणू दीर्घ काळ सक्रिय असतात. बोलत असताना तोंडातील लाळेची लहान कणे हवेत अधिक वेळ असतात. त्यातून विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर, जॉर्ज वॉशिंग्टन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. डेविड मायकल यांनी सांगितले की, हवेतील सुक्ष्म कणांमध्ये विषाणू असतात.

काही दिवसांपूर्वीच द लँसेंट या वैद्यकीय नियतकालिकेनेदेखील हवेतून करोनाचा संसर्ग फैलावत असल्याचे म्हटले होते. वर्जिनिया टेक्नोलॉजीचे एरोसोल तज्ज्ञ प्रा. लिन्से मार यांनी सांगितले की, कार्यस्थळांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एखादा बाधित कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असलेल्या इतर शेकडो कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ करू शकतो. इतरांनाही बाधा होण्याची अधिक शक्यता असते.

Leave a Reply

error: Content is protected !!