राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारास लागणार ब्रेक
टीम : ईगल आय मीडिया
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलनिया ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी सल्लागार होप हिक्स यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच सलग दुसरयावेळी निवडणूक जिंकण्याच्या ट्रम्प यांच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे.