अमेरीकेत कोरोनाचा कहर आणि ट्रम्प यांचे ” कमबॅक ” अभियान सुरु

निवडणूक मोहीम टीमच्या ६ जणांना कोरोनाची लागण


टीम : ईगल आय मीडिया
एका बाजूला अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे, मृत्यूने थैमान घातलेले आहे तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दुसऱ्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी कमबॅक रॅली हे प्रचार अभियान सुरु झाले आहे. टूलसा, ओखलाम या शहरात शनिवारी ट्रम्प यांची रॅली संपन्न झाली. यावेळी सुमारे ३० टक्केपेक्षा अधिक स्टेडियम मोकळे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ट्रम्प यांची निवडणूक मोहीम चालवणाऱ्या टीम मधील ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रॅलीच्या काही वेळ आधीच निष्पन्न झाले आहे.
अमेरिकेत सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. २२ लाखांहून अधिक लोक कोरोनाग्रस्त आहेत आणि १ लाख २१ हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. देशातील ४ कोटी लोकांचे रोजगार गेलेले आहेत. वर्णभेदावरून अनेक भागात दंगली होऊन वातावरण तणावग्रस्त बनलेले आहे. अनेक राज्यांनी ट्रम्प यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून कोरोना कंट्रोलसाठी स्वतंत्र धोरणे आखली आहेत. त्यावरून देशात राज्ये आडे केंद्र असा संघर्षही उभा राहिलेला आहे. या गदारोळातही ट्रम्प यांना निवडणूक महत्वाची असून त्यांनी पुन्हा एकदा व्हाईट हाऊस मध्ये परतण्याच्या इराद्याने ” कमबॅक रॅली ” चे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून टूलसा , ओखलाम येथे शनिवारी कमबॅक रॅलीचे आयोजन केले होते. या इनडोअर रॅलीसाठी १ लाखाहून अधिक लोक येतील अशी ट्रम्प यांच्या मोहीमचमूला अपेक्षा होती. मात्र ३० टक्केपेक्षा अधिक स्टेडियम मोकळे होते असे दिसून आले. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून लोकांसाठी मास्क , हॅन्ड स्यानेटायझर उपलब्ध करून दिल्याचा दावा केला असला तरी मास्क मिळाले नाहीत असे लोकांनी सांगितले. ” मेक अमेरिका ग्रेट अगेन ” अमेरिकेला पुन्हा मजबूत करण्यासाठी आपले कमबॅक अभियान सुरु असल्याचे यावेळी ट्रम्प बोलताना म्हणाले. माध्यमांनी या रॅली विरोधात भूमिका घेतली होती, त्यामुळे ट्रम्प यांनी निदर्शकांकडे दुर्लक्ष करून यासाठी माध्यमांना दोषी ठरवले.
यावेळी सभास्थळाबाहेर निदर्शनेही करण्यात येत होती आणि त्याठिकाणी ट्रम्प समर्थक आणि निदर्शक यांच्यात झटापटी झाल्या.


ट्रम्पचे टार्गेट रिपब्लिकचा बालेकिल्ला !
यावेळी ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या ओखलाम प्रांतातून निवडणूक अभियान सुरु केले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांना ओखलाम प्रांतातून २०१६ साली निर्णायक ६५ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकनचा बालेकिल्ला टार्गेट केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!