भारतीय नर्सची अमेरिकेत नवऱ्याने केली हत्या
टीम : ईगल आय मीडिया
हॉस्पिटलमधून ती बाहेर पडली, वाहन तळाकडे आपल्या कारकडे निघाली, तोवर पाठीमागून तिच्यावर सपासप वार झाले, खाली कोसळली असतानाच पुन्हा कार गाडी अंगावर घालून चिरडून टाकले. भारतीय नर्सची अशा क्रूर पद्धतीने अमेरिकेत तिच्याच नवऱ्याने हत्या केली. नवऱ्याला पोलिसांनी एका हॉटेलमध्ये ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल झाला आहे.
मेरिन जॉय (२६) असे या नर्सचे नाव आहे. ती मूळची केरळची असून 2016 मध्ये तिचा फिलिप मॅथ्यूबरोबर केरळमध्ये विवाह झाला होता आणि त्यांना 2 वर्षांची एक मुलगीही आहे.
मेरिन जॉय फ्लोरिडामधील कॉरल स्प्रिंग हॉस्पिटलमध्ये नोकरीला होती.2018 पासून त्यांच्यात वाद सुरू होते आणि डिसेंम्बर पासून फिलिप वेगळा राहत होता. तर सुरक्षेच्या कारणामुळे त्यांची मुलगी आजोळी केरळमध्ये राहते आहे. मेरिन आणि फिलिपमधील वाद मिटवण्याचे प्रयत्न दोन्ही कुटुंबातील लोकांनी केले मात्र त्यात यश आले नाही. आणि शेवटी फिलिपकडून मेरिनची हत्या झाली.
घरगुती वादातून ही हत्या झाली असे दक्षिण फ्लोरिडातील पोलिसांनी सांगितले. नवऱ्याने मेरिन जॉयवर अनेक वार केले. ती जखमी अवस्थेत तिला गाडीखाली चिरडले व आरोपीने तिथून पळ काढला असेही पोलिस म्हणतात.
मेरिन जॉयला लगेच पॉमपानो बीचजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिचा काही वेळातच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या कारच्या वर्णनावरुन पोलिसांनी मेरिनचा नवरा फिलीप मॅथ्यूला (३४) शोधून काढले. पोलिसांनी मॅथ्यू विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.