भारतीय मूळ कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा
टीम : ईगल आय मीडिया
जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून, ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा थाटात पार पडला.
या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश (ज्यू.) यांनी सपत्निक उपस्थिती होती. याप्रसंगी पॉपस्टार लेडी गागा यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताच, जो बायडन यांनी ट्विट करत,‘अमेरिकेसाठी एक नवा दिवस’ असल्याचं म्हटलं होतं.
पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरीस यांनी, बायडन यांच्यासमोर देशाला कोरोनासाथीमुळे झालेल्या आर्थिक व आरोग्य परिणामातून बाहेर काढण्याचे आव्हान असल्याचं म्हटलं. अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार लोक मरण पावले असून, लाखो लोक आर्थिक दुष्टचक्रात सापडले आहेत. आम्हाला बरेच काम करून अनेक आव्हाने पेलायची आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही काम करायला तयार आहोत. आम्हाला जास्तीत जास्त काम करावे लागेल व आमच्या काळातील मार्गक्रमण हे अवघड आहे, असे देखील हॅरीस म्हणा.
“हा ऐतिहासिक दिवस आहे, हा लोकशाहीचा दिवस आहे, हा अमेरिकेचा दिवस आहे. आज लोकशाहीच्या मूल्यांचा उत्सव आहे. आज लोकशाहीचा विजय झाला आहे. लोकशाहीचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. एकजुटीने अमिरेकेच्या विकासासाठी काम करू. अमेरिकेत वर्णभेद संपवण्यासाठी लढा द्यायचा आहे. सगळ्यांच्या विकासासाठी व रक्षणासाठी मी आहे. तसेच, आपल्या सर्वांना करोनाविरोधात देखील लढाई लढायची आहे. ” असं जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं.