डोनाल्ड ट्रम्पचा पराभव !

ज्यो बायडेन यांनी 284 मतांसह निवडणूक जिंकली

टीम : ईगल आय मीडिया

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत शनिवारी रात्री उशिरा ज्यो बायडेन यांचा विजय घोषित करण्यात आला आहे. बायडेन यांना 284 इलेक्टरॉल मते मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडन यांनी, पहिलं ट्विट करुन, अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलं हा मी माझा बहुमान समजतो अशी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात झालेली ही निवडणूक आणि त्याचा लागणारा निकाल याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. व्हाइट हाऊसमध्ये जानेवारी 2021मध्ये जो बायडन यांचा शपथविधी होईल.


जो बायडन यांना २६४ इलेक्ट्रोल मतं मिळाली आणि त्यानंतर आणखी २० मतं मिळाल्यानं त्यांच्या इलेक्ट्रोल मतांची संख्या २८४ झाली. विजयासाठी २७० इलेक्ट्रोल मते मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला.

जो बायडन यांनी या ट्विटमध्ये पुढं म्हटलं आहे की, अमेरिकेने मला राष्ट्राध्यक्ष केलं हा मी माझा बहुमान समजतो. आपल्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अमेरिकेपुढे जी आव्हानं आहेत त्यांना समर्थपणे तुमच्या साथीने सामोरं जाईन. तुम्ही मला मत दिलं असो वा नसो मी सगळ्या नागरिकांसाठीच माझं कार्य करेन. तुम्ही मला ज्या विश्वासाने या ठिकाणी बसवलं आहे तो विश्वास सार्थ ठरवेन या आशयाचं ट्विट जो बायडन यांनी केलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!