याच्या एका बुटाची किंमत आहे ‘१३ कोटी ४१ लाख रुपये’

हॉलिवूड रॅपर ” कान्ये वेस्ट ” च्या या बुटामध्ये असं आहे तरी काय?


टीम : ईगल आय मीडिया


लोकप्रिय हॉलिवूड रॅपर कान्ये वेस्टचा एक बूट चक्क १३ कोटी ४१ लाखांना ( १. ८ मिलियन डॉलरला ) विकला गेला आहे. हा कोणत्याही स्निकर बुटांच्या विक्रीचा नवा रेकॉर्ड आहे. कान्येने हे बूट ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात घातले होते. त्यानंतर त्यांना विक्रमी किंमत मिळाली आहे.


लोकप्रिय हॉलिवूड रॅपर कान्ये वेस्ट त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. आता मात्र कान्ये एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. त्याचा एक काळा बूट चक्क १. ८ मिलियन डॉलरला विकला गेला आहे. कोणत्याही स्निकर बुटांच्या विक्रीमध्ये ही किंमत सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे.

कान्ये वेस्ट हा अमेरिकन रॅप गायक, फॅशन डिझायनर आणि राजकीय नेता आहे. त्याचा जन्म अटलांटा येथे ८ जून १९७७ रोजी झाला आहे. आजवर २२ ग्रामी अवॉर्ड त्याला मिळाले आहेत. टाईम मासिकाने केलेल्या सर्व्हेत जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तो २००५ आणि २०१५ साली समाविष्ट होता.

स्निकर बुटांच्या विक्रीच्या बाबतीत ही किंमत विक्रमी मानली जातेय. हा बूट चक्क १३ कोटी ४१ लाखांना विकला गेला आहे. या बुटांची खास गोष्ट अशी की, हे बूट Nike Air Yeezy 1s ब्रॅण्ड चे असून कान्येने ते २००८ सालच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्या दरम्यान घातले होते. या बुटांमध्ये त्याने ‘हे मामा’ आणि ‘स्ट्रॉन्गर’ या गाण्यांवर सादरीकरण केलं होतं. खरं तर, स्निकर शूज नाइकी कंपनी आणि कान्येमध्ये एक ठराव झाला होता. त्यानुसार, या बुटांच्या मॉडेलला २००९ पर्यंत विक्रीसाठी बाजारात आणलं गेलं नव्हतं.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कान्येने या बुटांची जोडी RARES मधून खरेदी केली होती. हे एक स्‍नीकर इनवेस्‍टमेंट मार्केटप्‍लेस आहे आणि इथे लोकांना अनेक जुन्या आणि दुर्मिळ बुटांची खरेदी करण्याची संधी मिळते. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये याच ब्रॅण्डच्या Nike Air Jordan 1s बुटांना ६. १५ लाख डॉलर इतकी किंमत मिळाली होती. परंतु. कान्येच्या बुटांना मिळालेली किंमत त्या बुटांच्या तीनपट अधिक आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!