आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आला आणखी एक कोरोना विषाणू
टीम : ईगल आय मीडिया
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातून ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी दिली. नुकताच ब्रिटनमध्ये दुसऱ्या पिढीतील अधिक वेगाने पसरणारा विषाणू आढळलेला असताना आफ्रिकेतून तिसऱ्या पिढीतील अधिक वेगाने पसरणारा कोरोना विषाणू आढळल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या सर्व नागरिकांना स्वत: ला आयसोलेट करण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत.
नुकताच ब्रिटनमध्ये कोरोनाचा अतिशय झपाट्याने पसरणारा नवीन प्रकार आढळून आला. त्यावर उपाय शोधत असतानाच आता तिथे नवीन प्रकारचा कोरोना व्हारस आढळला आहे. आतापर्यंत या नवीन व्हायरसने प्रभावित झाले २ रुग्ण आढळून आले आहेत. नवीन कोरोना व्हायरस पूर्वीच्या व्हायरसपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने पसरतो, असं बोललं जातंय.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेत जाऊन आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये हा नवीन प्रकारचा करोना व्हायरस समोर आला आहे. त्याचे दोन रुग्ण आढळले आहेत, असं हॅनकॉक यांनी सांगितलं.
करोना व्हायरसचा एक नवीन प्रकार आढळून आला आहे आणि कदाचित त्यामुळे संसर्ग वेगाने वाढत आहे, असं दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात सांगितले होतं. हा नवीन कोरोना व्हायरस दक्षिण आफ्रिकेतही वेगाने पसरत आहे. कदाचित यामुळेच ब्रिटनला करोनाच्या दुसर्या मोठ्या लाटेचा सामना करावा लागतोय, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.