टीम : ईगल आय मीडिया
सार्वजनिक कार्यक्रमात अनेकवेळा आकस्मिकपणे बाका प्रसंग उभा राहतो अशा वेळी प्रसंगावधान राखून कृती केली जाते. मात्र जेव्हा एखादा मंत्रीच अशा प्रसंगी अगदी पोरकटपणा दाखवतो तेव्हा ती घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत येते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंत्र्यांनी चक्क दातानेच इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या उदघाटनाची फित कापली आणि स्वतःच व्हीडिओ share केला. या घटनेने सोशल मीडियावर ही चांगलेच रान उठवले आहे.
विशेष म्हणजे मंत्र्यांसह त्यांच्या या कृत्यावर उपस्थित लोकही हसत होते. आणि त्यानंतर त्या प्रसंगाचा व्हीडिओ मंत्र्यांनी स्वतः व्हिडीओ शेअर केला आणि दाताने रिबन का का कापावी लागली हे स्पष्ट केले. ‘कात्री बोथट आणि वाईट होती’ असे म्हणत ते म्हणाले की, ‘मालकाने दुकानाला पेचातून वाचवण्यासाठी नवीन विश्वविक्रम केला’. असेही मंत्री महोदय या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
एखाद्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लोकांनी राजकीय नेत्यांना आमंत्रित करणे असामान्य नाही. नुकतेच पंजाब प्रांतातील मंत्री फय्याज उल हसन चौहान यांना गुरुवारी त्यांच्या रावळपिंडी मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानासाठी रिबन कापण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या उद्घाटन समारंभात गेले तेव्हा त्यांना फित कापून उदघाटन करण्यासाठी दिलेली कात्री चालेना मग त्यांनी दातांनीच रिबन कापून शुभारंभ केला. त्यांनी या घटनेचा व्हीडिओ ट्विटरवर share केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात नेटिझन्स नी प्रतिसाद दिला आहे.