15 हजार फुट उंचावरून मारली उडी ; आणि पॅराशूट उघडले नाही

प्रशिक्षणार्थी सैनिक तरीही आश्चर्यकारकपणे बचावला

टीम : ईगल आय मीडिया

आसमान से टपका और खजूर मे अटका अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याचप्रकारे खरोखरच 15 हजार फूट उंचावरून खाली झेपावलेल्या सैनिकाचे पॅराशूट उघडलेच नाही आणि तो दणकून एका पत्र्याच्या घरावर आदळला, विशेष म्हणजे यामध्ये त्याला किरकोळ दुखापत झाली.

6 जुलै रोजी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या काही सैनिकांनी सॅन लुईस ओबिसपो काउंटीच्या परिसरात विमानातून 15 हजार फूट उंचावरून उड्या मारल्या. इतर सैनिकांची पॅराशूट नियोजनानुसार खुली झाली,मात्र एका ब्रिटीश सैनिकाचे पॅराशूट अखेरपर्यंत उघडलेच नाही. आणि हा सैनिक 15 हजार फूट उंचावरून खाली असलेल्या पत्र्याच्या घरावर आदळला. घराचे पत्रे फाटले आणि तो घरात पडला.

सॅन लुईस ओबिसपो काउंटीच्या रहिवाशांनी सरळ छतावर आदळण्यापूर्वी हा सैनिक हवेतून पॅराशूट करताना दिसला. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी आपल्या फेेेसबुुक पेेेजवर या घटनेची माहिती दिली आहे की, अज्ञात सैनिक हा मध्य कॅलिफोर्नियामधील कॅम्प रॉबर्ट्स प्रशिक्षण केंद्राच्या सराव

शिबिरात सहभागी सैनिकांच्या एका गटाचा भाग होता. दुर्घटना घडली कारण त्याचे पॅराशूट योग्य प्रकारे उघडण्यात अयशस्वी झाले.
पॅराशूट सैनिक पडल्या नंतर शुद्धीवर होता. मात्र वेदनामुळे त्याची हालचाल होत नव्हती. अ‍ॅटॅसॅडेरो पोलिस विभागाने फेसबुकवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. फायर अ‍ॅण्ड इमर्जन्सी सर्व्हिसेसने तातडीने पॅराशूटच्या सैनिकाच्या जखमेवर उपचार केले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. या घटनेत शिपायाला केवळ मध्यम जखम झाल्या आहेत आणि इतर कोणीही जखमी झाले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.


एका स्थानिक महिला रहिवाशांनी पत्रकारांना सांगितले की, या सैैनीकाच्या आवाजामुळे ती घाबरली होती आणि आपल्या घरातील साहित्य वाचवण्यासाठी ती घरात धावून गेली. घरातील साहित्य ठीक आहे का हे पाहण्यासाठी ती गेली असता तिला सैनिक पडलेला दिसला. तो शांत पडलेला होता मात्र जिवंत असल्याचे दिसत होते. त्या घराच्या मालकाने ही 15 हजार फूट उंचावरून पडूनही सैनिक जिवंत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि हा चमत्कार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!