अमेरिकेच्या लष्करी विमानाच्या चाकात लपून प्रवासाचा फसला
टीम : ईगल आय मीडिया
अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांनी राजधानीवर कब्जा केल्यानंतर भयभीत झालेले नागरिक जमेल त्या मार्गाने देश सोडू लागले आहेत. काबुल विमानतळावर बस स्टँड सारखी गर्दी झाली असून वडाप च्या जीपवर बसावे तसे लोक विमानात घुसू लागले आहेत, जागा मिळेल तिथे बसू लागले आहेत. याच प्रयत्नात अमेरिकेच्या लष्करी विमानाच्या चाकामध्ये बसून प्रवास करीत असलेले 3 अफगाण नागरिक हजारो किमी उंचावरून खाली पडले आणि जीवाला मुकले आहेत.
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर लोक कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानच्या विमानतळावर सध्या इतकी गर्दी पाहायला मिळते जणू ते विमानतळ नसून बस स्टँड आहे. आपल्या जीवासमोर सामानाची काय चिंता. आपले सर्वस्व सोडून हजारोंच्या संख्येने लोक विमानतळ गाठत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसावे असे चित्र आहे.
तालिबानच्या भीतीने देश सोडण्याच्या नादात हे तिघे अमेरिकेच्या लष्करी विमानातील चाकामध्ये लपले होते. चाकाच्या जागेत लपून आपण देश सोडता येईल असे त्यांना वाटत होते. पण, त्यापैकीच तीन जण विमान हजारो फुट हवेत असताना घसरून पडले. काहींच्या मते, हे लोक विमानावर बसून आणि लटकून प्रवास करण्याच्या नादात होते. उडत्या विमानातून लोक पडत असल्याचा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या राजधानीतून समोर आला आहे. यामध्ये एका पाठोपाठ एक तीन जण विमानातून पडताना दिसून येत आहेत. कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याच्या नादात हे लोक अमेरिकेच्या लष्करी विमानावर चढले होते. तसेच विमानाच्या टायरच्या जागेत लपून बसले होते. पण, काबूल विमानतळावरून जेव्हा या विमानाने उड्डान घेतले आणि विमान आपल्या वेगात आले तेव्हा एकानंतर एक तिघेही खाली पडले.
अफगाणिस्तान सोडण्यासाठी लोक काही करण्यास तयार आहेत. अशात सर्वाधिक गर्दी विमानतळांवर पाहायला मिळत आहे. हे विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षक अपयशी ठरत आहेत. याच दरम्यान गोळीबार झाला. यामध्ये 5 जणांचा जीव गेला. तसेच अनेक जण जखमी झाले.
राजधानीत लोकांना आपले मोबाईल रिचार्ज सुद्धा करता येत नाही. तर काही लोक आपले कॉल बॅलेन्स आणि इंटरनेट जीवन मरणाच्या परिस्थितीसाठी राखून ठेवत आहेत.