कोरोना वॉर : जागतिक आरोग्य संघटनेने चीन, जर्मनीचे केले कौतुक

भारतात पुरेसे प्रयत्न नसल्याचा अप्रत्यक्ष टोला


टीम : ईगल आय मीडिया

डब्ल्यूएचओ ने कोरोना लढाईमध्ये ज्या देशांच्या कामाचे कौतुक केले आहे, त्यामध्ये भारताचे नाव नाही. तर चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांची प्रशंसा करण्यात आली आहे.त्यावरून भारतात कोरोना प्रसाराला आला घालण्यात केंद्र आणि राज्य सरकारे अपयशी ठरत असल्याचा संदेश जागतिक पातळीवर गेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेट्रोस एडहानोम गेब्रेयसुस यांनी सोमवारी सांगितले की, डब्ल्यूएचओ संस्था सध्या सर्वाधिक वाईट जागतिक महामारीचा सामना करीत आहे. जगभरात एक करोड साठ लाखाहून अधिक लोक हे महामारीमुळे बाधित झाले आहेत. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे असे उपाय अवलंबावे लागतील. यातूनच कोरोना महामारीवर मात करणे शक्य आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कॅनडा, चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांचे कौतुक करून डब्ल्यू एच ओ चे महासंचालक यांनी त्या देशांचे कौतुक केले आहे.


ज्या देशांत विविध उपाययोजनांचे पालन करण्यात आले आहे. त्या देशात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. ज्याठिकाणी उपाययोजनांचे पालन करण्यात आलेले नाही, त्या ठिकाणी संक्रमितांची संख्याही वाढलेली आहे. जगाच्या विविध भागात नवीन कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

यामध्ये काही देश असे आहेत की, त्यांच्याकडून सुरुवातीला तिथे स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात रुग्ण वाढत आहेत. कोरोना महामारी जगभरात साडे सहा लाख लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे covid-19 टेस्टिंग सेंटरचे सोमवारी उद्घाटन केले. याचा फायदा पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांना होणार आहे. यावेळी कोरोना काळात आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून भारताची स्थिती ही इतर देशांच्या तुलनेत चांगली असल्याचे म्हटले आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या इतर मोठ्या देशांच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या या स्पष्टीकरनामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा कोरोना विरोधातील लढाईत पुरेसे प्रयत्न न केलेला देश अशी असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!