अर्थमंत्री व शिक्षणमंत्र्यांशी शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा : आ. सावंत

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आज (दि.15 ) मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आ दत्तात्रय सावंत, आ श्रीकांत देशपांडे व आ बाळाराम पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांचे सोबत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची सह्याद्री येथे बैठक संपन्न झाली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयातील प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक नव्याने 20 टक्के अनुदान सुरु करावायाची नस्ती आणी 20 टक्के ची टप्पा वाढ ही नस्ती सादर करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत अशी माहिती आ सावंत यांनी दिली.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवासंरक्षण आणी नव्याने जाहिर करावयाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या तसेच कमवी चे 1298 वाढीव पदे यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान , सोमवारी दुपारी 2 वाजता मुंबईतून खा शरद पवार बाहेर गेले होते. त्यामुळे शिक्षण विषयक सर्वच समस्या मांडण्याकरीता खा. पवार यांची उद्या परत भेट मागीतली आहे. उद्या ते जेथे कुठे असतील तेथे त्यांना भेटण्याचा प्रयत्न सुरु आहे असेही आ. सावंत म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!