पुणे : ईगल आय मीडिया
सोमवारी सासवड येथून निघणाऱ्या संत चांगावटेश्वर पालखी सोबतचे 2 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आल्या नंतर संध्याकाळी माऊलींच्या पादुका सोबत जाणारे एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.
सोमवारी संत चांगावटेश्वर पालखी सोबत जाणारे 2 वारकरी पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्या पालखी सोबत आता केवळ 10 वारकरी जाणार आहेत. ,
सोमवारी आळंदी येथील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे अधिकारी 20 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह पुणे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत म्हणजेच नीरा या गावापर्यंत जाणार होते.
आता त्यांच्या सोबत जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. मधुमेह असलेल्या या अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
आळंदीचे मुख्याधिकारी यांच्याशी त्या अधिकाऱ्यांचा सम्पर्क आला होता, त्यामुळे मुख्याधिकारी भूमकर यांनी आपला swab तपासणीसाठी दिला आहे.