आषाढीचा निर्णय लांबणीवर : 29 मे नंतर स्पष्ट होणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया
संपूर्ण महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायाचे लक्ष लागलेल्या आजच्या पुणे येथील बैठकीत आषाढी यात्रेसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. 29 मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत निर्णय होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या आषाढी यात्रे संदर्भात आज पुण्यात झालेल्या मीटिंगमध्ये कोणताही निर्णय झाला नाही. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मिटींगमध्ये देहू, आळंदी, सह सोपनकाका संस्थानचे प्रतिनिधी आणि पुणे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी, आ. उल्हास पवार आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी या बैठकीस व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

यावेळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपणकाका पालखी सोहळा प्रामुखानी शासनाकडे पालखी सोहळ्यासंदर्भात आपला प्रस्ताव सादर केला. परंपरेनुसार दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रस्थान 12 आणि 13 जून रोजी होणार आहे. त्यानुसार आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

सध्या कोरोनाची परिस्थिती आणि पुढच्या काळात काय परिस्थिती असू शकते यावर निर्णय घेऊ . पालखी सोहळा संस्थान नी दिलेले प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेऊ, चर्चा करून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय जाहीर करू असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
यामुळे यंदाची आषाढी यात्रा कशी होणार, पालखी सोहळे कधी निघणार, कसे निघणार याबाबतचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे सम्पर्क होऊ शकला नाही, त्यामुळे अजित पवार यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी फोनवर बोलून माहिती घेतली.

Leave a Reply

error: Content is protected !!