कौठाळीत वृक्षारोपण करून संपन्न झाला विवाह

पंढरपूर : ईगल आय मीडिया


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौठाळी ( ता. पंढरपूर ) येथील धुमाळ परिवाराच्यावतीने वृक्षारोपण करुन, साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. कौठाळी येथील परमेश्वर नामदेव धुमाळ यांची कन्या स्नेहा व अभिमान धोंडीराम शेळके यांचे चिरंजीव दीपक यांचा विवाह सोहळा सोशल डिस्टंसिंग चे पालन करत मोजक्या लोकांमध्ये पार पडला.

प्रारंभी दोन्ही वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या विवाह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सामाजिक अंतर ठेवत साधेपणाने हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. ह्यावेळी वधूवरांना व उपस्थित मोजक्याच लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत हा विवाह सोहळा पार पडल्याचे दिसून आले.

या विवाह सोहळ्यासाठी सरपंच शंकर गोडसे, माजी सरपंच महादेव गाढवे, उपसरपंच नामदेव लेंडवे, माजी उपसरपंच अरुण धुमाळ, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ईश्वर धुमाळ ,माजी सैनिक पांडुरंग धुमाळ ,अरुण नागटिळक ,शिवक्रांती परिवाराचे अध्यक्ष रामदास नागटिळक आधी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!