धक्कादायक : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे याना कोरोना


टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे, या संदर्भात बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकृत माहिती दिली.
विशेष म्हणजे त्यांच्यासह मुंबईतील गाडीचा चालक, स्वयंपाकी, वाहनचालक इतर ५ जनानांही कोरोना लागण झाली आहे. मुंढे यांनी बुधवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थिती दाखवली होती. त्यावेळी त्यांच्या संपर्कात कोण आले होते, त्यांचे सचिव, सुरक्षारक्षक, अधिकारी यांचाही शोध घेऊन त्यांना 14 दिवस होम क्वारनटाईन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील कोरोना बाधित होणारे धनंजय मुंढे हे तिसरे मंत्री आहेत, यापूर्वी गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.मात्र उपचार करून हे मंत्री पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामाला लागले आहेत. मुंढे यांनाही लागण झाल्यानंतर इतर मंत्री, त्यांची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे..

Leave a Reply

error: Content is protected !!