पंढरपूरात मुस्लिम स्मशान भूमीतील रस्त्याचे मनसेने केले काँक्रीटीकरण

शहरातील  रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरून घेतल्यानंतर  हिंदू स्मशान भूमीचीही दुरुस्ती मनसेच्या वतीने धोत्रे यांनी  केली.

फोटो
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  पंढरपूर शहरातील बडा कब्रस्तान येथील रस्त्याच्या काँक्रीटचे काम गुरुवारी सुरु करण्यात आले. 

पंढरपूर ; eagle eye news
येथील मुस्लिम समाजाच्या कारस्तानातील रस्त्याचे काँक्रीटीकरण मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चातून हाती घेतले आहे. गुरुवारी या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पंढरपुरातीलहे  कब्रस्तान हे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होते. या ठिकाणी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही.  तसेच अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व इतर बाबी या  झाल्या नाहीत. या ठिकाणी काळी माती असल्यामुळे पावसाळ्यात पूर्णपणे चिखल होत होता त्यामुळे नागरिकांना यातून चालणे कठीण होत होते . हीच बाब लक्षात घेऊन आता कब्रस्तानाच्या विकासाकरता दिलीप धोत्रे यांनी पाऊल टाकले आहे.

उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी पावसाळ्यात पंढरपूर शहरातील  रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरून घेतल्यानंतर  हिंदू स्मशान भूमीचीही दुरुस्ती मनसेच्या वतीने धोत्रे यांनी  केली आहे. त्यानंतर  मुस्लिम समाजाच्या बडा कब्रस्तानातील सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करून देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.  पंढरपूरच्या  बडा कब्रस्तान आणि छोटा कब्रस्तान या दोन्ही कब्रस्तानातील अंतर्गत रस्ते हे पूर्णपणे कॉंक्रिटीकरण करून देण्याचा निर्णय घेतला आणि ह्या कॉंक्रिटीकरणाची सुरुवात गुरुवारी करण्यात आली.  

 यावेळी सुधीर धोत्रे,  जयवंत भोसले,  लखन चौगुले,संजय बंदपट्टे , श्रीकांत शिंदे ,दत्ता भोसले , शिवाजी मस्के,  महंमद उस्ताद,  शशिकांत पाटील,  संतोष कवडे , गणेश पिंपळनेरकर , सुमित शिंदे , पिंटू पवार, आण्णासाहेब  धोत्रे , नागेश इंगोले, शफीक सय्यद ,आदम बागवान ,सलीम सय्यद, जमीर सय्यद, रफीक अत्तर ,वसीम शेख ,आरिफ शेख ,असिफ शेख ,जमीर तांबोळी इत्यादी उपस्थित  होते.

Leave a Reply

error: Content is protected !!