पंढरपूर तालुका पंचायत समिती ठरली जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या 9 महिन्यापासून कोरोना साथी मुळे संपूर्ण जनजीवन, प्रशासन व्यवस्था विस्कळीत झालेली असताना ही पंढरपूर तालुका पंचायत समितीने जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट पंचायत समितीचा बहुमान पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी 1 जानेवारी रोजी हा सन्मान स्वीकारला.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समित्यांना प्रोत्साहन म्हणून दर महिन्याला रँकिंग देण्यात येत असते. मध्यंतरी ही परंपरा खंडित झाली होती. मात्र जि प चे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही रँकिंग परंपरा पुन्हा सुरू केली आहे.

त्यानुसार सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पंढरपूर तालुका पंचायत समितीला, दक्षिण सोलापूर द्वितीय आणि करमाळा पंचायत समितीला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. नुकतेच प्रशासकीय बैठकीत हा सन्मान करण्यात आला. गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी हा सन्मान स्वीकारला.

पंढरपूर तालुका पंचायत समितीने गेल्या वर्षभरात कोरोना काळ असतानाही खूप चांगले काम केले आहे त्या कामावर हा सन्मान शिक्कामोर्तब मानला जात आहे. याबद्दल गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!