पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयाटी कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे तालुक्यातील पाच नागरिक आज कोरोनातून पुर्णपणे बरे झाल्यांनतर त्यांना आज मोठ्या उत्साहात घरी सोडण्यात आले.
वाखरी येथील एमआयाटी कोरोना केअर सेंटर येथे दाखल उपरी येथील दोन, पंढरपूर येथील दोन तर करकंब येथील एक असे पाच जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, कोविड 19 चे समन्वय अधिकारी डॉ.धनंजय सरवदे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी अभिजीत रेपाळ, बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमंत बागल यांच्यासह वैद्यकीय अधिकारी -कर्मचारी आदी उपस्थित होते.
वाखरी येथील एमआयाटी कोरोना केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेल्या पाच जणांना 14 दिवस क्वारंटरईन करण्यात आले होते. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थिातांनी पुष्पवृष्टी करुन हरिनामाच्या जयघोष करीत त्यांना केअर सेंटर मधून घरी पाठविण्यात आले. तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते उपाययोजना करण्यात आल्या आहेत.